बीग ब्रेकींग : भरधाव टँकरने शेतकऱ्याला उडविले; संतप्त ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने रस्ता ओलांडत असतांना ५५ वर्षीय शेतकऱ्याला उडविल्याने जागीच मृत्यू झाला असून एक म्हैस दगावल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नेरी ते म्हसावद रोडवरील विटनेर गावाजवळ घडला आहे. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला होता. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. सुकलाल पंडित सोनवणे (५५, रा. विटनेर, ता. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नेरी-म्हसावद रस्त्यावरील विटनेर गावातील सुकलाल सोनवणे यांच्याकडे पाच म्हशी असून त्यांचा दुग्ध व्यवसायासह शेतीचे काम होते. मंगळवार, १९ डिसेंबर रोजी सुकलाल सोनवणे हे म्हशी चारण्यासाठी गेले होते. तेथून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास म्हशी घेऊन घरी येत असताना केमीकल घेऊन जाणाऱ्या भरधाव टॅँकरने (जीजे१२, बीव्ही ७४७५) म्हशीसह शेतकऱ्याला जोरदार धडक दिली. त्यात सोनवणे हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती गावासह परिसरात वाऱ्यासारखी पसरली व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर ठिय्या दिली. त्यामुळे वाहतुक पूर्णतः ठप्प झाली होती.

घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधीकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू मयताला मदत देण्याची मागणी केली. सुकलाल सोनवणे यांचा दुग्ध व्यवसाय असून तेच घरातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आहे. मुलगा शेती करून वडिलांना हातभार लावत होता. सोनवणे यांच्या अपघाती मृत्यूमुळे घरातील कर्ता पुरूष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content