महिला वैद्यकिय अधिकाऱ्याने केली गर्भवती महिलेला मारहाण

jalgaon district hospital help to lady 2017099293

जळगाव प्रतिनिधी | गरीबांचे माहेरघर असलेल्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या महिला प्रसुतीगृहात ड्युटीवर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकार्‍याने गर्भवती महिलेला मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच या महिला डॉक्टरने नातेवाईकांशी देखील अर्वाच्च भाषेत वाद घातल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. या प्रकाराची व महिला डॉक्टरची गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

अशी झाला प्रकार
वरणगाव येथील गायत्री राजेश कोळी (वय-21) ह्या गर्भवती असल्याने गुरुवार ९ मे रोजी दुपारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसुती विभागात दाखल झाल्या होत्या. गुरुवार सायंकाळपासून प्रसुतीगृहात महिला डॉ. स्वाती बाजेड यांची ड्युटी होती. रात्री देखील डॉ.बाजेड याच ड्युटीवर होत्या. शुक्रवार सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास प्रसुतीसाठी आलेल्या गायत्री राजेश कोळी यांची तपासणी करीत असतांना डॉ. बाजेड यांनी तिला चापटांनी पाठीवर, मांडीवर मारले. त्यानंतर तिला प्रसुतीगृहाबाहेर काढून प्रसुतीला वेळ असल्याचे सांगितले. बाहेर आल्यानंतर गर्भवती महिलेने तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरने आत मारहाण केल्याचे सांगितल्याने कुटुंबिय संतापले. त्यांनी डॉ. बाजेड यांना जाब विचारल्याने त्यांनी कुटुंबियांशी व नातेवाईकांशी देखील अर्वाच्च भाषेत बोलून वाद घातला. तसेच डॉ. बाजेड यांनी गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी अनेक गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाईकांनी अर्वाच्च भाषेत बोलून वाद घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉ. बाजेड यांची रुग्णालय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांच्याकडे तक्रार केली.

डॉ. बाजेड यांचा रात्रभर संताप
डॉ. स्वाती बाजेड यांची गुरुवारी सायंकाळीपासून ड्युटी होती. शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांची ड्युटी असल्याने त्यांनी जवळपास १८ प्रसुती केलेल्या असल्याची माहिती परिचारिकांनी दिली. त्यामुळे त्यांचा रात्रभर संताप झाला होता. संताप वाढल्याने डॉ. बाजेड सकाळपासूनच नातेवाईक व रुग्ण असलेल्या गर्भवती महिलांशी अर्वाच्च भाषेत बोलून संताप करीत होत्या.

गर्भवती महिलां दिली असभ्यतेची वर्तणूक
शुक्रवारी सकाळपासून गर्भवती महिला गायत्री राजेश कोळी हिला पाठीवर, मांडीवर चापटांनी मारहाण केल्यानंतर डॉ. बाजेड यांनी वैशाली संदीप सपकाळे रा. मुहखेडा या गर्भवती महिलेशी देखील वाद घालून दमदाटी केली. मग कशाला हौस करतात अशा शब्दात देखील डॉ. बाजेड एका गर्भवती महिलेला बोलल्या असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

तपासणीची सुविधा उपलब्ध नाही
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसुती विभागात गर्भवती महिलेला आवश्यक असलेल्या एकही तपासणीची सुविधा उपलब्ध नाही. या सर्व गर्भवती महिलांना तपासणी खाजगी रुग्णालयातून करून घ्यावी लागते. बर्‍याचवेळा तपासणीचे रिपोर्ट येईपर्यंत गर्भवती महिलेला ताटकाळत थांबावे लागते. दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयच्या प्रसुती विभागात येणार्‍या गर्भवती महिलांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी कायमस्वरुपी दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून होत आहे.

Add Comment

Protected Content