Home क्राईम महिलेला शेतात नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

महिलेला शेतात नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

0
42


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावदा ते रावेर रोडवर ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवरून बसवून नेत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यात राहणारी ३५ वर्षीय महिला हरी २२ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने पायी घरी जात होत्या. त्यावेळी रस्त्याने चिंतामन विक्रम बारेला रा. नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर आणि राजेश मुकेश बारेला रा. इंटारिया ता. झीरण्या जि. खरगोर हे दोघे दुचाकीने रस्त्यावरून जात असतांना गावाकडे सोडून देतो असे सांगून तिला दुचाकीवर बसविले. त्यानंतर तिचा हात पकडून शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कशीबशी दोघांच्या तावडीतून सुटून महिला निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीवरून निभांरा पोलीस ठाण्यात चिंतामन विक्रम बारेला रा. नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर आणि राजेश मुकेश बारेला रा. इंटारिया ता. झीरण्या जि. खरगोर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound