जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी  । पंडीत दिनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे   ३०   व ३१   मे  रोजी  आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे  यांनी दिली आहे. 

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वा जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी,एचएससी,पदवीधर, पदवीकाधारक,आयटीआय पात्रतेची एकूण ६७०  रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे. या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगीन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावे.  याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्याकडे या कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये  असेही डॉ. कोल्हे, यांनी कळविले आहे.

Protected Content