महापौर व उपमहापौर पदाची निवड बिनविरोध होणार

 

जळगाव राहूल शिरसाळे । भाजपतर्फे आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज घेण्यात आले. याप्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी दीपक सूर्यवंशी व भगत बालाणी यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होणार असून आ. गिरीश महाजन व आ राजूमामा भोळे हे ठरवतील त्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले. तर पक्षात यावरून कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौरपद हे खुला महिला प्रवर्गासाठी असून तर उपमहापौरपद हे अनारक्षित आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवड गुरुवार १८ मार्च रोजी होणार आहे. यासाठी भाजपतर्फे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी महापौर व उपमहापौर पदाचे प्रत्येकी चार चार असे आठ अर्ज घेतले. तर गटनेते भगत बालाणी यांनी देखील यांनी महापौर व उपमहापौर पदाचे प्रत्येकी चार चार असे आठ अर्ज घेतले. दोन्ही पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत १७ मार्च रोजी दुपारी २ वाजेची आहे. तर माघारीची मुदत ही १८ रोजी  अर्ज छाननीनंतर १५ मिनिटांचा राहणार आहे. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/223710056158025

 

Protected Content