किरकोळ कारणावरून तरूण शेतकऱ्याला चौघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा गावात असलेल्या गोपाळवाडा परिसरात शेताच्या बांधावर म्हैस आल्याच्या कारणावरून एका तरुण शेतकऱ्याला ५ जणांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी बुधवारी ५ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा येथे योगेश तुळशीदास गोपाळ (वय-३०) हा तरूण वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता योगेशच्या शेताच्या बांधावर म्हैस आल्याच्या कारणावरून जाब विचारला. या रागातून गोरख आप्पा गोपाळ, प्रकाश आप्पा गोपाळ, चेतन बापू गोपाळ, आप्पा ओंकार गोपाळ आणि ताराबाई आप्पा गोपाळ सर्व रा. वावडदा, ता. जि. जळगाव यांनी लाठ्याकाठ्या घेऊन योगेश गोपाळ व त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर योगेश गोपाळ याने रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोरख आप्पा गोपाळ, प्रकाश आप्पा गोपाळ, चेतन बापू गोपाळ, आप्पा ओंकार गोपाळ आणि ताराबाई आप्पा गोपाळ सर्व रा. वावडदा, ता. जि. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content