जळगावात बुधवारी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील  सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी 29 मार्च, 2023 रोजी एक दिवसाच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील कंपन्यानी या मेळाव्यात वेगवेगळ्या प्रकाराची 129 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

 

या मेळाव्याचा 10 वी नापास/पास, 12 वी पास, आय. टी. आय पदवीका व पदवीधारक ईच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा. विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी नांव नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अप्लाय करावा. तसेच ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा.

 

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content