Home Cities जळगाव स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा आणि माजी विद्यार्थी संघ समिती स्थापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचे ज्ञान, अनुभव आणि सहकार्याचा उपयोग करून घेणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. आर. एस. महाजन होत्या. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी प्रा. आर. बी. ठाकरे, सेवानिवृत्त शिक्षिका प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, समन्वयक प्रा. उमेश पाटील आणि प्रा. गुणवंत वंजारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. महाजन यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांची माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील उपलब्ध सोयी-सुविधांची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघ समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रद्धा पाटील, उपाध्यक्षपदी पार्थ देशपांडे, सचिवपदी प्रा. राजश्री महाजन आणि कोषाध्यक्षपदी प्रा. वीणा भोळे यांची निवड करण्यात आली. सल्लागार सदस्य म्हणून प्रा. ए. बी. मेटे, प्रा. आर. बी. ठाकरे आणि प्रा. स्वाती बऱ्हाटे यांचा समावेश करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थिनी प्रा. मयुरी हरिमकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

माजी विद्यार्थी संघ हा महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासह महाविद्यालयाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या मेळाव्याला खुशबू माळी, प्रांजल पाटील, प्रियंका मोरे, कावेरी पाटील, हर्षदा पाटील आणि धनंजय गुंजाळ यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. छाया चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रमोद भोई, प्रा. प्रज्ञा पाटील, प्रा. छाया पाटील, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. दिनेश पाचपोळ, प्रा. लीना भारंबे, प्रा. सूर्यकांत बोईनवाड, प्रा. उमेश ठाकरे आणि प्रा. जयंत इंगळे यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound