रायपुर येथे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपुर येथे ग्रामपंचायत कार्यालय ते आंगणवाडी शाळापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन मंगळवारी माजी उपसरपंच उषाबाई परदेशी यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून गावातील रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली होती. या निधीतून ग्रामपंचायत कार्यालय ते आंगणवाडीपर्यंतच्या रस्त्याचे भूमीपूजन मंगळवारी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपसरपंच उषाबाई दिलीप परदेशी यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पूजा करून व नारळ फोडून कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे. याप्रसंगी रायपूर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच प्रवीण परदेशी, ग्रामपंचायत सदस्य वसंत धनगर, पुष्पाबाई परदेशी, शितल परदेशी, संगिताबाई इंगळे, ग्रामसेवक जयपाल चिंचोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Protected Content