गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अरिंदम फ्रेशर्स पार्टी व स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणात.. संगतीला मंद वारा… एकामागून एक असे दर्जेदार हिंदी-मराठी बहारदार गीतांचे सादरीकरण तसेच विविध नृत्याविष्कार… उपस्थीतांद्वारे टाळ्यांची साथ तर हौशींद्वारे वन्स मोअरची मागणी… अशा जल्लौषपुर्ण वातावरणात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या अरिंदम फ्रेशर्स पार्टी व स्नेहसंमलनाचा  उत्साहात समारोप झाला.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रागंणात गेल्या सप्ताहापासून सूरू असलेल्या अंतिम वर्षाच्या संघर्ष गु्रपतर्फे आयोजित अल्फा स्पोटस फेस्टचा समारोप सोमवार दि.२७ मार्च रोजी सायंकाळी अरिंदम फे्रशर्स पार्टी व स्नेहसंमेल २०२३ ने करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह सन्मानीय सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन एस आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, गोदावरी अभियांत्रकीचे प्राचार्य डॉ. विजय पाटील, नर्सिंग महाविद्यालय प्राचार्या मौसमी लोंढे, उपप्राचार्य विशाखा वाघ, शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर,  आदिंच्या प्रमुख उपस्थीतीत दिपपज्वलनाद्वारे फ्रेशर्स पार्टी व स्नेहसंमेलनाचा थाटात प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांचा सत्कार द्वारे फे्रशर्स पार्टीला उत्साहात सुरुवात झाली. सर्वप्रथम गणेशवंदना सादर करण्यात आली. त्यानंतर केजीएफ, शिवाजी महाराज, कोरोना एसीटी, शिव तांडव, फंट्यासी डान्स, एसआरके स्पेशल, मालवणी स्पेशल, आर्मी डान्स, भिमकन्या, जलेबी बेबीज अशा विविध थीमवर गृप डान्सचे सादरीकरण झाले. तसेच जोगवा, लावणी द्वारेही फ्रेशर्स पार्टीची रंगत वाढली. गृप डान्स, ड्यूएट डान्स, सोलो डान्स, गीतगायन, अ‍ॅक्ट अ‍ॅण्ड डान्स, कपन डान्स असे विविध गायन,वादन व नृत्य सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टी उत्साहाने सहभागी घेत आनंद लुटला.प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह शिक्षकांनी देखिल आपली गायन कला सादर करीत उपस्थीतांची मने जिंकली.सरप्राईज नृत्याविष्काराने समारोप करण्यात आला. प्रथम ते अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता.

Protected Content