हाताची नस कापून विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । २ लाखांची मागणी करत छळ व त्रासाला कंटाळून हाताची नस कापून विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील विद्यानगर येथे माहेर असलेल्या श्वेता पवन वावरे यांचा विवाह शेगाव येथील पवन श्याम वावरे यांच्यासोबत रीतीरीवाजानुसार झालेला होता. दरम्यान पती पवन श्याम वावरे याने बाहेरून २ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच सासू मोठी, ननंद, नंदोई भाऊ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी केलेल्या त्रासाला कंटाळून श्वेता वावरे यांनी हातातील नस कापून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान पतीसह ह सासर्‍यांनी सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या आई पार्वती सदाशिव मुळे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पती पवन श्याम वावरे, सासू कल्पना शाम वावरे रा. शेगाव, बुलढाणा, ललिता उर्फ पप्पी सुनिल राजगे, सुनील राजगे रा. अमरावती, सुनिता उर्फ बबली अर्णव महानवर रा. ठाणे या ५ जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मोरे करीत आहे.

Protected Content