संविधान रक्षक दल भीम आर्मीची यावल तालुका कार्यकारणी जाहीर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । संविधान रक्षक दल भीम आर्मी यावल तालुका युनिटची बांधणी संदर्भात नुकतीच मार्गदर्शन बैठक आयोजित केली आली असून कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

संविधान रक्षक दल महाराष्ट्र प्रमुख रमाकांत तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. जळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे, उपाध्यक्ष विक्रम प्रधान यांच्या सुचणे नुसार तर जिल्हा सचिव राजु इंगळे, मुख्य संघटक डॉली वानखेडे यांच्या साथीने महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्याच बरोबर या बैठकीत डॉ. योगेश भालेराव यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, तर यावल तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे घोषित करण्यात आलेली आहे, सचिन वानखेडे यावल तालुका अध्यक्ष, मिलिंद जंजाळे यावल तालुका उपाध्यक्ष, शिवाजी गजरे यावल तालुका सचिव, गौरव सोनवणे यावल तालुका महासचिव, विनोद भालेराव यावल तालुका कार्याध्यक्ष, सतीश अडकमोल यावल तालुका मुख्य संघटक, राजू वानखेडे यावल तालुका संघटक, विनोद सोनवणे यावल तालुका सचिव, धनराज तायडे यावल तालुका सहसचिव, करण ठाकरे यावल तालुका प्रचार प्रसिद्धी प्रमुख, सदर बैठकी प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील युवक व असंख्य कार्यकर्ते उपस्तित होते. तर संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जंजाळे यांनी केले आहे.

 

Protected Content