श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । अयोध्येत उभारण्यात येणार्‍या भव्य श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन करणार्‍या देवगिरी प्रांत जिल्हाध्यक्षपदी सतपंथ देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची निवड करण्यात आली आहे.

अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी भारत भूमीतील सर्व जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाचा तन-मन-धनाने सहभाग असावा व या मंदिरासाठी माझे ही योगदान आहे अशी प्रत्येकाच्या मनात आंतरिक भावना उत्पन्न व्हावी या प्रमुख उद्देशाने श्रीराम तीर्थक्षेत्र अयोध्या यांनी देशात विभागवार समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देवगिरी प्रांत भुसावल जिल्ह्याचे मुख्य कार्यालय भुसावळ येथे स्थापन करण्यात आले आहे. यााचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या बैठकीत समिती गठित करून सर्वानुमते महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची देवगिरी प्रांत भुसावल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बैठकीत जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यालय व स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहे. दिनांक १५ जानेवारी २०२१ पासून श्री राम मंदिरासाठी प्रत्यक्ष निधी संकलनाला सुरुवात करण्यात येणार असून ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संकलन केले जाणार आहे. देणगीदारांना संस्थेची अधिकृत जमा पावती दिली जाणार असल्याचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या ऐतिहासिक कार्यात सहभागी होऊन प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, देवगिरी प्रांत भुसावळ जिल्हा समिती पुढीलप्रमाणे आहे-
अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, निधी संकलन उपाध्यक्ष प्रजापिता ब्रह्मकुमारी सिंधू दीदी भुसावळ, निधी संकलन उपाध्यक्ष प्रा. संजय बाविस्कर, उपाध्यक्ष वसंतराव महाजन तांदलवाडी, सदस्य शास्त्री भक्तीप्रकाश दासजी महाराज सावदा, गोपाल चैतन्यजी महाराज पाल, हभप हरणे महाराज मुक्ताईनगर, महामंडलेश्‍वर पुरुषोत्तमदासजी महाराज फैजपुर, श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, स्वरूपानंद महाराज डोंगरदे, हभप धनराज महाराज अंजाळेकर, सुनील कुमार उदासी वेदधाम, पांडव बाबा, मुरलीधर श्रीरंगी भुसावळ, हंसदासजी महाराज, ऋषिकेश महाराज, सुरेशशास्त्री मानेकर, महेश फालक भुसावळ, मिलिंद अग्रवाल भुसावळ, प्राचार्य पी. आर. चौधरी फैजपूर, शशिकांत देशमुख यावल, रमेश विठू पाटील पाडळसे, डॉ. सौ. निलिमा नेहते भुसावळ, विभाग संघचालक शशीकांत महाजन भालोद, श्रीकृष्ण चावरीया, श्रीकांत लाहोटी, शशिकांत कोलते, सचिन कडू चौधरी निंभोरा यांचा समावेश आहे.

Protected Content