हातनुरचे १४ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

167005876 Hatnur Dam 6

भुसावळ, प्रतिनिधी | रविवार २८ जुलै रोजी हतनूर धरणाचे १४ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता पाण्याची पातळी २०९.७० मी होती.

हतनूर धरणात रविवारी  एकूण पाणी  संचयन १८४.१० मिमी तर थेट संचयन ५१.१० मिमी ३  पाण्याचा विसर्ग ३६४.०० क्युमेक्स आहे.  हतनूर पाणलोट क्षेत्रात एकूण पाऊस २६१.२० एवढा पाऊस झाला आहे.  मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल शनिवार २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता १६ दरवाजे हे आर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. सकाळी पाणीसाठा हा २०९.९१० मिमी होता. या १६ दरवाज्यातून ४३२.०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग झाला होता. तर दुपारी २.३० वाजता ८ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. धरणाचा एकूण साठा हा १८२.४० क्युसेक्स इतका होता. तापी नदीवर असलेलं हतनूर धरण हे जळगावातील एक मुख्य धरण आहे. येथून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, यावल, बोदवड, रावेर या तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरण ओसंडून वाहत असल्याने या परिसरातीभूल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Protected Content