अखेर हतनूर धरणातून सुटले आवर्तन !

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार हतनूर धरणातून तापी पात्रात आतर्वन सोडण्यात आले आहे.

पालिकेकडे थकबाकी वाढल्याने पाटबंधारे विभागाने हतनूर धरणातून आवर्तनास नकार दिला होता. यामुळे दीपनगर आणि भुसावळ येथे पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले होते. या प्रकरणी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे झालेल्या बैठकीत पालिकेने थकबाकी चुकती करत प्रलंबित करारनामा करून देण्याचे मान्य केले. यामुळे शनिवारी सकाळी हतनूरमधून आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे दीपनगर आणि भुसावळवासियांना दिलासा मिळाला आहे.

हतनूरमधून ३५०० क्युसेसचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामध्ये सलग तीन दिवस १ हजार क्युसेस, तर अर्धा दिवस ५०० क्युसेस पाणी सोडले जाणार असल्याची माहिती तापी महामंडळातर्फे देण्यात आलेली आहे.

Protected Content