जिल्ह्यात शाळा बंद आंदोलनाचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । थकीत वेतनेत्तर अनुदान तात्काळ उपलब्ध करुन द्यावे अन्यथा १५ जानेवारी पासून शाळा बंद करण्यात येतील असा इशारा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी दिला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, खासगी शिक्षण संस्थांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरु करण्याचे धोरण निश्‍चित केले आहे मात्र, शाळा सुरु करण्यापूर्वी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. यासह ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझरीसाठी शाळा व महाविद्यालयाच्या इमारतींची साफसफाई करून त्या सुसज्ज कराव्या लागणार आहेत. यासाठी मोठा खर्च येणार आहे. यावर्षी पालकांनी शालेय फी भरलेली नाही, यामुळे संस्थाचालकांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. देशातील इतर राज्यांमध्ये नऊ ते दहा टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. महाराष्ट्रात हा खर्च सहा टक्के आहे. यामुळे गुणवत्ता व चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे कठीण होत आहे. शासनाने वेतनेतर अनुदान व कोविडसाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी संस्थाचालकांनी केली आहे.

या अनुषंगाने शाळा सुरु करण्यापूर्वी १५ जानेवारीपर्यंत शासनाने थकीत वेतनेतर अनुदान तात्काळ उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे केली आहे. या मुदतीत अनुदान दिले नाहीतर १५ जानेवारीपासून बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी दिला आहे.

Protected Content