चाळीसगाव शहरात स्वर्णिम विजय मशाल यात्रेस प्रारंभ (व्हिडीओ)

चाळीसगाव जीवन चव्हाण । भारत-पाकीस्तान युद्धात विजयाचे शिल्पकार व शहीद झालेल्या जवानांच्या गावातील पवित्र माती एकत्रित करून मंगल कलश दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी सन्मानपूरक नेण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्वर्णिम विजय मशाल यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते स्वर्णिम विजय मशालेला १६ डिसेंबर २०२० रोजी प्रारंभ करण्यात आली आहे. १९७१ च्या भारत-पाकीस्तान युद्धात विजयाचे शिल्पकार असलेल्या सैनिकांना परमवीर चक्र व महाविर चक्र तसेच शहीद झालेल्या जवानांच्या गावातील पवित्र माती एकत्रित करून मंगल कलश दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी सन्मानपूरक नेण्यासाठी ह्या यात्रेला प्रारंभ करण्यात आले आहे. स्वर्णिम विजय मशाल यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १६ डिसेंबर २०२० रोजी प्रारंभ करण्यात आली आहे. ही यात्रा आज औरंगाबाद मार्गेने चाळीसगाव शहरात ११ वाजता दाखल झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल चौक) येथून धगधगत्या मशाल घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा नानासाहेब य.ना.चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमाला ११:३० वाजेला कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ते १ वाजेपर्यंत सुरू होता. 

यावेळी ब्रिगेडीयर विजय अनंत नातू , कॅप्टन माने, खासदार उन्मेष पाटील, वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, उमंग संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संपदा पाटील, राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर.जाधव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रंथपाल अण्णा धुमाळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांची संख्या ही लक्षणीय होती. प्रास्ताविक कॅप्टन माने यांनी केली तर आभार ब्रिगेडीयर विजय अनंत नातू यांनी व्यक्त केले. यावेळी कॅप्टन माने यांनी आपल्या प्रास्ताविकेत सैनिकांच्या गावातील पवित्र माती एकत्रित करून मंगल कलश दिल्लीत १६ डिसेंबर २०२१ ला राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी सन्मानपूरक नेण्यासाठी या दिवसी घेऊन जाणार असल्याचे सुतोवाच केला.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/256204279225379

Protected Content