गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात एम.बी.ए व  एम.सी.ए मधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा Induction Program घेतला गेला.

 

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. चेतन सरोदे यांनी  केले.

 

महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी महाविद्यालयाबद्दल माहिती दिली व सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी विचारसरणी असते. जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करा व नेहमी अद्ययावत रहा. विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकास, निरंतर वाचन, संभाषण कौशल्य यावर जास्त भर दिला पाहिजे.  रोजगारक्षम बनाण्यावर भर द्या जेणेकरून कंपनी तुम्हाला प्राधान्य देईल.

 

यावेळी एम.बी. ए चे समन्वयक प्रा. वैजयंती असोदेकर यांनी एम.बी.ए चा अभ्यासक्रम, परीक्षेची गुणप्रणाली, क्रेडिट पॉईंट्स इत्यादी विषयी माहिती दिली तर प्रा. मिताली शिंदे यांनी एम.सी.ए च्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे दोन सत्रात आयोजन केले होते. पहिल्या सत्रामध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्ययाबद्दल, अभ्याक्रमाबद्दल माहिती दिली गेली. दुसऱ्या सत्रात मॅनेजमेंट गेम खेळले गेले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोमा निसाद व चंदा जावळे या विद्यार्थिनीने केले.

आभारप्रदर्शन हेमांगी पाटील या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. चारुशीला चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या  डॉ. नीलिमा वारके व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content