भिलपूरा परीसरात रेशनदुकानावर तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात नागरीकांना शासनाच्या वतीने रेशन धान्य वाटप करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य वाटपाचे आदेश असतांना शहरातील भिलपुरा चौकात असलेल्या रेशन दुकानात सोशल डिस्टन्सिंगचा उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परीसरात कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला असतांना नागरीकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येते.

कोरोना विषाणूने राज्यासह देशात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागरीकांना घरी बसण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुणावरही येवू नये या उद्देशाने राज्य सरकारने मोफत अन्न धान्य वाटप सुरू केले आहे. यास प्रत्येक नागरीकाने आपली जबाबदारी म्हणून ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टालण्यासाठी व त्यास हाकलून लावण्यासाठी प्रत्येकाने ‘सोशल डिस्टंगसिंग’ पाळणे गरजेचे आहे.

दरम्यान शोसल डिस्टन्सिंग ठेवून धान्य वाटपाच्या सुचना असतांना शहरातील भिलपूरा चौकात असलेल्या एका रेशन दुकानावर रेशनधारकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसून आले. भिलपूरा भागात काही दिवसांपुर्वी कोरोनाबाधिक एक रूग्ण आढळून आला होता. अशा परिस्थितीत संचारबंदीचे कोणतेही नियम पाळतांना दिसून येत नाही. सोशल डिस्टन्सिंग पालन करण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नागरीक जास्त गर्दी करतील असे कार्यक्रमांवर बंदी असून इतर दुकाने उघडण्यास परवानगी आता देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात नागरीकांची वर्दळ दिसून येत आहे.

Protected Content