जळगावात लवकरच ऑनलाईन किराणा दुकान

आपल्याला हव्या त्या शॉपमधून खरेदी केलेला माल मिळणार घरपोच !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आपल्याला हव्या त्या किराणा स्टोअरमधील वस्तूंची ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा प्रदान करणारी सेवा शहरात लवकरच सुरू करण्यात येत आहे. लाईव्ह मीडिया व्हेन्चरच्या या सेवेत आपल्याला घरबसल्या हव्या त्या दुकानातून किराणा माल व तत्सम वस्तू मागविता येणार आहेत.

सध्या कोणतीही सुविधा नाही

सध्या सुरू असणारा कोरोनाचा प्रकोप हा लवकर लयास जाण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यामुळे सुरक्षितपणे ऑनलाईन खरेदी हा अतिशय उत्तम प्रकार आता सर्वत्र रूढ झालेला आहे. यात सध्या आपण विविध ई-कॉमर्स स्टोअरवरून हव्या त्या वस्तू घरपोच मागवू शकतो. तथापि, किरणा माल, धान्य, डेअरी प्रॉडक्ट आदींना कुणी घरपोच आणून देत नाही. यात हव्या त्या दुकानातून सिलेक्ट केलेला माल ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा सध्या जळगावात नाही. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन जळगावात लवकरच ऑनलाईन किराणा स्टोअर सुरू करण्यात येत आहे.

लाईव्ह मीडिया व्हेन्चरचा उपक्रम

लाईव्ह मीडिया व्हेन्चरने विविध ऑनलाईन सेवांमध्ये आपले नैपुण्य सिध्द केलेले आहे. याच समूहातर्फे हे ऑनलाईन किराणा स्टोअर सुरू करण्यात येत आहे. खरं तर डिसेंबर २०२० मध्ये याला कार्यान्वित करण्याचा आमचा मानस होता. तथापि, सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या आपत्तीमुळे जळगावकरांची आवश्यकता लक्षात घेऊन याला येत्या काही दिवसांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. आमच्या सर्व अभियंत्यांनी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून याला सुरू केल्याचे आम्ही नम्रपणे नमूद करत आहोत.

अशी असेल कार्यप्रणाली

ही सुविधा हायपर लोकल ई-कॉमर्स या संकल्पनेच्या अंतर्गत जळगावकरांना प्रदान करण्यात येणार आहे. यात कंपनीतर्फे ऑनलाईन वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅप कार्यान्वित करण्यात येत आहे. यावर जळगावातील विविध किराणा दुकाने यांची नावे दिसणार आहे. त्यातील तुम्ही निवड केलेल्या नावाच्या दुकानावर क्लिक केल्यास त्या दुकानात उपलब्ध असलेल्या किराणा वस्तू दिसणार आहे तसेच प्रत्येक वस्तूंची पॅकिंग, वजन आणि दर सुध्दा समोर दिसणार आहेत. त्यासोबतच ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करावयाच्या आहेत त्या समोर सिलेक्ट (ीशश्रशलीं) रवव लरीीं बटन क्लिक केल्यास त्या वस्तूंची यादी तयार होईल म्हणजेच त्याच क्षणी तुम्ही निवड केलेल्या वस्तूची ऑर्डर ऑनलाईन तुमचे कडून दिली जाईल. त्यासाठी बिल अदा करण्याचे अनेक पर्याय सुध्दा उपलब्ध असतील. नोंदणीकृत ऑर्डर च्या वस्तू तुम्ही नोंद केलेल्या पत्त्यावर कंपनी द्वारा लगेच दुसर्‍या दिवशी तुम्ही दिलेल्या वेळात घरपोच करण्यात येतील. या सुविधेमुळे अर्थातच जळगावकरांना हव्या त्या दुकानातून माल खरेदी करण्याच्या समाधानासह तो माल घरपोच देखील मिळणार आहे.

ग्राहकांना अनेक लाभ

आमच्या डिजीटल मंचावरून ऑर्डर देण्याचे ग्राहकांना अनेक फायदे आहेत. यात प्रामुख्याने ग्राहकाचे पेट्रोल-डिझेल व महत्वाचे म्हणजे वेळेची बचत होणार आहे. सध्या कोरोनामुळे सर्व जण फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करत असून या प्रकारे ऑर्डर दिल्यामुळे कोरोनासारख्या घातक विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही उरणार नाही. काही किराणा स्टोअर्स घरपोच माल देत असले तरी यात एकाच ठिकाणी संपूर्ण प्रॉडक्टचे दर व पॅकींगचे पर्याय पाहण्याची कोणतीही सुविधा नाही. या सर्व सुविधा आम्ही आपल्याला एकाच ठिकाणी देणार आहोत. यामुळे आमची सेवा ही ग्राहकांसाठी अनेक आयामांमधून लाभदायक ठरणार आहे.

दुकानदारांना व्यवसायवृध्दीची सुुवर्णसंधी

जळगाव शहरातील किराणा दुकान, धान्य दुकान, डेअरी, ड्रायफ्रुटस दुकानदार आदींसह अन्य नित्योपयोगी वस्तूंचे विक्रेते (एफएमसीजी) यांना आम्ही आमचा ऑनलाईन मंच उपलब्ध करून देत, दोन आठवड्यांमध्ये ही सेवा जळगावकरांना सादर करत आहोत. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे दुकानदारांना नोंदणीसह आमच्या डिजीटल मंचावरील लिस्टींगसाठी कोणतीही अतिरिक्त आकारणी करण्यात येणार नाही. जळगावातील इच्छुक दुकानदारांनी यासाठी सेल्स को-ऑर्डीनेटर नितीन चौबे यांच्याशी ८८८८८०३१३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content