इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे २१५ कामगारांची मौखिक आरोग्य तपासणी

जळगाव, प्रतिनिधी| येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसीतील व्हेगा केमिकल्स येथे दोन दिवसीय कामगारांची मौखिक आरोग्य तपासणी आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा २१५ कामगारांनी लाभ घेतला.

 

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ व २२ डिसेंबर रोजी कार्यक्रम झाला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्हेगा केमिकल्सचे संचालक भालचंद्र पाटील, दंतरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा वानखडे-राऊत, मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा गोस्वामी, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा नीता परमार उपस्थित होते.

यावेळी तंबाखूमुक्ती व मौखिक आरोग्य तसेच असंसर्गजन्य रोगाविषयी नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात आली. कामगारांची दंत व मुख तपासणी करण्यात आली. तपासणी डॉ. अनुराधा वानखडे, डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. नितीन भारती,मानस उपचार तज्ज्ञ निशा कत्रे, भौतिकोपचार तज्ज्ञ देवयानी महाजन, रुचिका साळुंके यांनी केली. याप्रसंगी तीन कामगारांनी “आजपासून तंबाखू खाणार नाही” अशी शपथ घेत तंबाखू खाणे सोडत असल्याचे सांगितले.

यावेळी पीपीटीद्वारे मौखिक आजारांविषयी माहिती देऊन त्याचे दुष्परिणाम व उपाय याबाबत माहिती डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. नितीन भारती दिली. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि कर्करोग यासह दातांची निगा कशी राखावी याचीही माहिती देण्यात आली. तंबाखूच्या कॅन्सरने मृत्युदर वाढले आहेत, त्यामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होते. हे लक्षात घेता तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून लांब राहावे असे मार्गदर्शन नीता परमार यांनी केले. याप्रसंगी जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, व्हेगा केमिकल्सचे संचालक निमिष पाटील, व्यवस्थापक जितेंद्र भावसार, निधी शाह, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या दीपा टिब्रेवाल, आयएसओ दिशा अग्रवाल उपस्थित होते.

Protected Content