यावल बाजार समितीची ऑक्सीजन बेड सेन्टरसाठी मदत

 

यावल : प्रतिनिधी  । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील न्हावी व  फैजपुर येथे लोकसहभागातुन उभारणीस येणाऱ्या कोवीड१९ रुग्णांसाठीच्या ऑक्सीजन बेड सेन्टरसाठी  आर्थिक मदत करण्यात आली आहे .

 

यावल तहसील कार्यालयात आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने चेअरमन तुषार पाटील , कृउबा माजी सभापती तथा संचालक कृषीभुषण नारायण चौधरी यांच्यासह बाजार समितीचे उपसचिव विजय कायस्थ आदींनी  १० हजार रूपयांची मदत निवडणुक शाखेचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्या स्वाधीन केली

 

याप्रसंगी तहसीलचे कोषागार विभागाचे  मुक्तार तडवी , सुयोग पाटील , संजय गांधी विभागाचे प्रफ्फुल कांबळे हे उपस्थित होते . दरम्यान फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी कोरोना रुग्णांची ऑक्सीजन आणी वेळेवर होत नसलेल्या उपचाराअभावी होणारी भटकंती थांबविण्यासाठी लोकसहभागातुन जे .टी . महाजन अभियांत्रीकी महाविद्यालय येथे  ५० ऑक्सीजन बेड व ड्युरा सिलेंडर उभारणीचा संकल्प हाती घेत मदतीचे आवाहन केले  आहे यास रावेर व यावल तालुक्यातुन   दानसुर मंडळीकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे .

 

Protected Content