पाचोरा येथील कांतीलाल शेठ यांची नात घेणार दीक्षा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील गांधी चौकातील सोन्या – चांदीचे व्यापारी कांतीलाल शहा यांची नात मुमुक्षु कु. इशिका बेन गौतम चंदजी राठोड चेन्नई येथील रहिवासी यांनी पाचोरा येथे जैन भगवती दीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना सर्व नातेवाईक व समाजबांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

मुमुक्षु कु. इशिका बेन गौतम चंदजी राठोड यांनी जैन भगवती दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून त्यांच्या सर्व परिवार सर्व नातेवाईक व सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन पाचोरा येथे जैन मंदिर येथून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे जल्लोषात स्वागत व सत्कार व सदभावना दिल्या. सर्व परिवाराने व समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा देऊन “साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा” या म्हणीप्रमाणे त्यांनी तिचे दीक्षाभूमी घेण्यासाठी सर्वत्र सहकार्य करून तिला जैन धर्माप्रमाणे जैन मंदिरात सर्व विधी व सर्व कार्यक्रम करून संन्यासासाठी रवाना केले. यावेळी पाचोरा शहरातील जैन समाज बांधव सोनार बांधव व गांधी चौकातील रहिवाशी यांचा समावेश होता. कार्यक्रमाप्रसंगी पाचोरा येथील जैन सकल श्रावक संघ व पाचोरा सराफ असोसिएशन व इतर मंडळी तसेच समाजातील सर्व महिला उपस्थित होत्या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन पाचोरा जैन सकल श्रावक संघ यांनी केले होते.

Protected Content