जुनी पेन्शन योजनेसाठी ग्रामसेवक संघटना जाणार बेमुदत संपावर

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । राज्य सरकारचे सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी ची नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह विविध व्यायिक मागण्यासाठी १४ डिसेंबर २०२३ पासुन बेमुदत संपावर जात आहे.  या संपास यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या अंतर्गत प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या शासकीय , निमशासकीय , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळुन शासना या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करावी, यासह विविध न्यायिक मागण्यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहे. या संपात मध्यवर्ती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांनी पुकारलेल्या संपात यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन आज यावल पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर निळे व कार्यालय अधिक्षक जि एम रिंधे यांना देण्यात आले.

याप्रसंगी तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत महाजन, उपाध्यक्ष रविंद्र बाविस्कर , मानद अध्यक्ष शिवाजी सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक तायडे, ग्रामसेवक पतपेठी पारोळाचे संचालक भाईदास पारधी, मानद सचिव राजु तडवी , तालुका कार्यध्यक्ष डी. डी. पाटील , वरिष्ठ सहाय्यक पि आर चौधरी , पगारदार नोकरांच्या पतपेठीचे व्हाईस चेअरमन पी व्ही तळेले , संघटनेच्या महीला संघटक सुषमा कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content