डोंगरकठोरा येथे पाणीटंचाई समस्यावर युध्दपातळीवर शर्तीचे प्रयत्न

dongarkathora

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रुप ग्रामपंचायतच्या डोंगरदे हे आदीवासी गाव गेल्या दोन आठवडयापासून पेयजल समस्यापासुन तर अज्ञात आजारामुळे चर्चेस आले असुन, पाणीटंचाईच्या समस्यावर युध्दपातळीवर शर्यतीचे प्रयत्न करण्यात आले आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले ६९२ लोकवस्ती व ९१ घरांचे डोंगरदे हे गाव डोंगरकठोरा ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलेले गाव असुन, या गावातील मागील आठवडयात अचानक अज्ञात आजाराने तिन लहान बालक दगावल्याची गंभीर घटना घडली. काही बालक देखील आजारी पडल्याचे प्रकार घडले आहे.

या अज्ञात आजाराने मरण पावलेल्या बालकांच्या कुंटुबाचे आरोप आहे की, ही सर्व लहान बालके चुकीच्या लसीकरण दिल्यामुळे मृत्यू झाला. मात्र, आरोग्य विभागाकडुन या विषयी चुकीची माहीती प्रसारीत करण्यात येत असल्याचे आरोप लावण्यात येवुन दुषीत पाण्यामुळे जर हा प्रकार घडला असता तर संपुर्ण गावचयात आजारी पडले असते. यासाठी आरोग्य विभागाने आपले निदान योग्य दिशेने करावे, अशी सुचना डोंगरकठोरा, डोंगरदे ग्रूप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमनबाई वाघ यांनी दिले असुन आपल्या निष्काजीपणाचे खापर ग्रामपंचायतीवर फोडु नये असेही सांगीतले आहे. आमची ग्रामपंचायत गेल्या तिन दिवसापासुन डोंगरदे गावापासुन दीड किलोमिटर लांब असलेल प्रकाश पुरुषोत्तम राणे यांच्या विहीरीवरील टुयुबवेल ही अधिगृहीत करून युद्धपातळी डोंगरदे गावातील २० हजार पाण्याची क्षमता असलेल्या जलकुंभात जोडण्यात यश आले असुन येत्या काही तासातच डोंगरदे येथील आदीवासी बांधवाना पिण्यासाठी स्वच्छ आणी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती डोंगरकठोरा ग्रामपंचायतचे उपसरपंच नीतिन भिरुड यांनी सांगीतले.

डोंगरदे गावाची पेयजल समस्या सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर झालेल्या विहीर अधिग्रहणाच्या कामासाठी गावातील शेतकरी प्रकाश पुरुषोतम राणे यांच्यासह ग्राम पंचायतीचे प्रदीप पाटील, सोमा पाटील, सायबु तडवी, रामा पावरा, कलेश कोल्हे यांनी त्यांना सहकार्य केलेल्या सांगीतले. आता गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला असुन आरोग्य विभागाने तात्काळ योग्य प्रकारे उपचार करून ही अज्ञात आजाराची साथ खरे निदान करून गावातील संकटाची साथ आटोक्यात आणावी, अशी प्रतिक्रीया आदीवासी बांधव व्यक्त करीत आहे.

Add Comment

Protected Content