अल्पवयीन आत्महत्याप्रकरणी पोक्सो कलम लावा – चौकशी अधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव, प्रतिनिधी । तांबापुरा येथील अल्पवयीन मुलीस १९ जुलै रोजी फूस लावून पळवून नेले व दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला होता. याप्रकरणात पोक्सो कलम लावण्यात यावे अशी मागणी पीडितांच्या आईने चौकशी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तांबापुर येथील अल्पवयीन मुलीस १९ जुलै रोजी फूस लावून पळवून नेले व दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशन येथे फूस लावून पळविले बद्दल गुन्हा नोंद केला. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत व पोस्को कलम १२ प्रमाणे विशाल भोई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज ८ ऑगस्टपर्यंत पीएम नोट न मिळाल्याने तसेच इतर कागदोपत्री पुरावा आढळून न आल्यामुळे भा द वि ३७६ व पोकसो कलम ४ हे कलम पोलिसांनी अद्याप लावले नाही. एवढेच नव्हे तर भा द वि ३०२ प्रमाणेच कारवाई करावी अशी मागणी पीडितांच्या आईने चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. चौकशी अधिकारी राऊत यांनी फिर्यादी सोबत आलेले सामाजिक कार्यकर्ते मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख ,शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, शाह बिरादरीचे आसिफ शाह, अनिस शाह तांबापूर येथील समाज सेवक वसीम खान , लतीफ खान अजिज बाबा, मुख्तार शाह यांना समजावून सांगितले की, पीएमनोट व इतर अहवालमध्ये आलेल्या पुराव्यावरून निश्चितच इतर कलम वाढवण्यात येतील. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनी सदर प्रकरणी योग्य रीतीने तपास सुरू असून आपल्या निवेदनाची सुद्धा आम्ही योग्य ती दखल घेऊ व मुस्कानला पूर्ण न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शिष्ट मंडळास दिले. दरम्यान, फारूक शेख यांनी पत्रक प्रसिद्ध केले असून या प्रकरणी आज १९ दिवस झाले तरी जळगाव मधील महिला संघटना इतर संघटनांनी मौन पत्करले आहे एकीकडे सुशांत सिह आत्महत्या प्रकरणी सीआयडी, सीबीआय मागणीसाठी सर्व पक्ष ,संघटना लढत आहे. परंतु अल्पवयीन व झोपडपट्टीत राहणारी मुस्कानसाठी कोणीही आवाज काढत नसल्याची खंत शेख यांनी आपल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

Protected Content