खळबळजनक : दोन तरुणांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून !

राजगुरुनगर (वृत्तसंस्था) दोन तरुणांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना खापरदरा येथे उघडकीस आली आहे.

 

या खून झालेल्या तरुणांची ओळख पटली नसुन या दोन्ही तरुणांचे अंदाजे वय ३० वर्ष आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिरोली खापरदरा येथील हरणटेकडी येथे दोन अनोळखी तरुणांचे मुत्यदेह काटेरी झाडा झुडपांत पडलेले होते. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन्हीही तरुणांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलिसांन दारूची ग्लास आणि गांजा पिण्याची चिलीम सापडली आहे. त्यामुळे पार्टीनंतर ओळखीच्या मारेकऱ्यांनीच हे खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Protected Content