कळमसरे ग्रामपंचायतीला शवपेटी भेट

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या स्थानिक जिल्हा परिषद विकास निधीतून सुसज्ज शवपेटी देण्यात आली.

शवपेटीचे लोकार्पण नुकतेच सरपंच जगदीश  निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, ग्राम विकास अधिकारी एस.डी. सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा महाजन, नगराज चौधरी तसेच हेमंत चौधरी, मोतीलाल चौधरी, सुनील बाविस्कर, भागवत कोळी, विठ्ठल महाजन, धर्मेन्द्रसिंग राजपूत, सुदाम मिस्तरी, आधारभाऊ कोतवाल, हेमंत न्हावी, विठ्ठल होलर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content