Home Cities जळगाव शरद पवार यांचा जिल्हा दौरा : चांदसर व जळगावात कार्यक्रम

शरद पवार यांचा जिल्हा दौरा : चांदसर व जळगावात कार्यक्रम

0
31


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा जळगाव दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यांच्या उपस्थितीत चांदसर आणि जळगाव येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असून दिनांक १५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर त्यांच्या उपस्थितीत चांदसर (ता. धरणगाव ) येथे माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ते दुपारी विकास मुरलीधर पवार यांच्या फार्महाऊस येथे भोजन घेतील. यानंतर दुपारी पवार साहेब हे अजिंठा विश्रामगृहात येणार आहेत.

यानंतर दुपारी चार वाजता शिवतीर्थ मैदानावर लोकसंघर्ष मोर्चातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या आदिवासी परिषदेला शरद पवार साहेब संबोधीत करणार आहेत. यानंतर सायंकाळी ते विमानाने औरंगाबाद येथे जाणार आहेत. याबाबतचा अधिकृत दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे.

 


Protected Content

Play sound