कोरोना ; चाळीसगाव , जामनेर वगळता जिल्ह्याला आज दिलासा , फक्त २२१ नवे रुग्ण

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संसर्गात गेल्या २ दिवसात लक्षणीय घट होतांना दिसून येत असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात २२१ बाधीत रूग्ण आढळून आले आज ३३१ पेशंटनी कोरोनावर मात केली आहे.

आज जळगाव जिल्ह्यात अन्यत्र संसर्ग ओसरल्याचे दिसून आले असले तरी चाळीसगाव व जामनेरातील  रूग्ण संख्या वाढीस लागलेली आहे.

जळगाव शहर- ३३, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ- ०४, अमळनेर- ०८, चोपडा- ०५, पाचोरा-०१, भडगाव – ०५ धरणगाव-०१, यावल- १९, एरंडोल- ०३, जामनेर-३६, रावेर-२३, पारोळा-०५, चाळीसगाव-३६, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१४ इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

प्रशासनाकडून आज आलेल्या अहवालात आजपर्यंत १ लाख ३९ हजार १३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ०५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ५७० बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ०७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content