ठाकरे-पवार भेटीमुळे रखडला मुक्ताईनगरच्या चार नगरसेवकांचा प्रवेश !

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांसोबत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वर्षावर दाखल झाल्याने मुक्ताईनगरच्या नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश काही वेळासाठी रखडला आहे. यामुळे आज सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले असून चौघे नंतर प्रवेश घेणार आहेत.

जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर मुक्ताईनगर नगरपंचायतीतील भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश निश्‍चीत झाला आहे. https://livetrends.news आज सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांना शिवबंधन बांधण्यात आले. याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती.

दरम्यान, सहा नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वर्षावर दाखल झाले. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी आणि उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीच्या आधी ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक करत आहेत. https://livetrends.news यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवरून वर्षाकडे रवाना झाले. याचमुळे मुक्ताईनगरातील चार नगरसेवक आता आज रात्री अथवा उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content