बुद्ध पौर्णिमानिमित्त चाळीसगावात वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । आज (दि.26 मे) रोजी संपूर्ण जगात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतचे वतीने येथील नुकतेच कार्यान्वित झालेल्या महात्मा फुले जन आरोग्य शासकीय रुग्णालयात मल्टी पॅरा मॉनिटर या वैद्यकीय उपकरणांचे 5 संचांचे लोकार्पण करण्यात आले.

या समाजोपयोगी व विधायक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायतचे अध्यक्ष , माजी आमदार प्रा. साहेबरावजी घोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर ,उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसील अमोल मोरे, शहर पो.स्टे.चे पो. नि.विजयकुमार ठाकूरवाड हे होते. या मान्यवरांचे हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन बौद्ध पंचायत चे सरचिटणीस व कार्यक्रमाचे संयोजक धर्मभुषण बागुल यांनी केले.

कोरोना योद्ध्यांचा गौरव

या प्रसंगी ,चाळीसगाव तालुक्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही सर्व सामान्य लोकांसाठी सतत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यां चा देखील बौद्ध पंचायत च्या वतीने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने आयु.वर्धमान धाडीवाल समाज देवक ,आयु.दिलीप घोरपडे सह्याद्री प्रतिष्ठान ,आयु.लक्ष्मण शिरसाठ संभाजी सेना ,आयु.गणेश पवार रयत सेना ,आयु.पंकज पाटील लाईफ सेव्हर गृप ,आयु.मुराद पटेल रहा अपडेट गृप आणि तेली समाजाचे वतीने प्रातिनिधिक म्हणून आयु.सदानंद चौधरी व त्यांचे सहकारी यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी बौद्ध पंचायतीचे कौतुक केले आणि आयोजंकांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. या उपक्रम साकार व्हावा  म्हणून सर्व स्तरातील बौद्ध बांधवांनी सढळ हस्ते सहकार्य केल्याचे यावेळी आयोजकांनी मनोगतात बोलून दाखविले व त्यांचे सर्वांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी , कोरोना च्या काळात गेले एक दीड वर्षापासून ज्येष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ बापूराव बाविस्कर यांनी बजावलेल्या सेवेचा उल्लेख करून अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात त्यांचा देखील गौरव केला व त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याला उजळणी दिली.

बौद्ध पंचायतीचे पदाधिकारी आयु.प्रभाकर जाधव ,आयु.रामचंद्र जाधव नगरसेवक , आयु.गौतम झाल्टे ,आयु.महेश चव्हाण ,आयु.गौतम जाधव ,आयु. ऍड. राहुल जाधव ,किरण जाधव ,स्वप्नील जाधव यांचे हस्ते प्रमुख अतिथिंचा सत्कार करण्यात आला. बौद्धाचार्य भैय्यासाहेब ब्राम्हणे यांनी बुद्ध वंदना करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. पंचायतीचे पदाधिकारी आयु.रामचंद्र जाधव ,गौतम जाधव ,राहुल जाधव ,स्वप्नील जाधव यांचे सह संजय केदार सर ,विष्णु जाधव ,प्रदीप चौधरी व अनेक तरुण सहकाऱ्यांनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर ,कारभारी केदार, प्रकाश सोनवणे सर ,आनंद ढिवरे ,विजय जाधव ,शरद जाधव,संजय सोनवणे आदी सहकारी उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूराव बाविस्कर ,डॉ.मंदार करंबळेकर व कर्मचारी आयु.रणजित गव्हाळे व त्यांचे सहकारी यांनी व्यवस्थापन करण्यासाठी चोख मदत केली. हा कार्यक्रम पार पाडताना शासकीय निर्बंध काटेकोर पाळण्यात आले .उपस्थित सर्वांना सॅनिटायझर व मास्क पुरविण्यात आले होते.व फिजीकल डिस्टन्स राखण्यात आले होते.

 

 

 

 

 

Protected Content