नगरसेवकांनी दिली आयुक्तांना मोकाट कुत्र्यांची पिल्ले भेट (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास पाहता यावर नियंत्रण मिळविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आयुक्तांना सभागृहात मोकाट कुत्र्याची पिल्ले भेट दिल्याने मनपा परिसरात एकच खळबळ माजली.

शहरात मोकाट कुत्र्यांचा दिवसेंदिवस हौदस वाढत चालला आहे. मागील दोन दिवसापासून मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडत आहे. मनपा प्रशासनाकडे वारंवार मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सभागृहात मांडूनही त्यांच्याकडून कोणताही तोडगा काढण्यात येत नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. आज स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर गंभीर व्हावे यासाठी सभा सुरु होण्यापूर्वी स्थायी सदस्य शिवसेनेचे प्रशांत नाईक, भाजपचे नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण आदींनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना स्वतः सह आणलेले मोकाट कुत्र्याची दोन पिल्ले भेट देवून शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/230977225187427

 

Protected Content