गीता नगरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचे बंद घर फोडले

जळगाव प्रतिनिधी । शहरालगत असलेल्या खेडी परिसरातील साईगीता नगरात साडेतीन लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

अधिक माहिती अशी की, चंचल टेकचंद शर्मा (वय ४१) रा. साईगीता नगर हे कुटुंबासह महिनाभरापासून दिल्ली येथे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून प्रवेश केला आहे. ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, दागिने व ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. शर्मा यांची रोहित रोडवेज नावाने जळगावात ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. घरकाम करणाऱ्या व्यक्तीला घरफोडी झाल्याचे लक्षात आल्याने त्याने हा प्रकार शर्मा यांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Protected Content