चितळे यांच्या पोस्टमागे बोलविता धन्याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादीची मागणी (व्हिडीओ)

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.शरद पवार यांच्याबदल अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टची चौकशी करुन त्यांच्यामागे बोलविता धन्याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा.” अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमळनेरच्या वतीने पोलिसांना  देण्यात आले.

या निवेदनात “पोस्टवरून चितळे यांची मानसिकता खालवलेली दिसून येत असून त्यांच्यामागे बोलविता धनी कोण ? याचा देखील शोध लागला पाहिजे. तसेच जीवन मृत्यू कोणाच्या हातात नसून एक प्रकारे या पोष्टद्वारे त्यांनी पवार साहेबांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दिसून येत आहे.

या पोस्टमध्ये संत तुकाराम यांचे नाव टाकत महाराजांनी लिहीलेल्या अभंगाचा अपमान केलेला आहे. अशा पध्दतीने कुठल्याही अभंगात अशी लिखाण संतांनी केलेली नाही. यामुळे हिंदू धर्म वारकरी संप्रदायाच्या देखील भावना दुखावलेल्या आहेत. या संपूर्ण सोशल मीडियावरील टाकलेल्या पोस्टची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा.” अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमळनेरच्या तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने अमळनेर पोलिसांना देण्यात आले.

व्हिडीओ लिंक :
https://fb.watch/d28h652oT3/

Protected Content