जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी बि.के.पारधी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातीत मारुळ येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी बि.के. पारधी यांची जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या व्हाईसचेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

अट्रावल आणि मारुळ तालुका यावल येथील ग्रामविकास अधिकारी बि.के. पारधी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय मारुळ येथे त्यांचे सत्कारपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळ गावचे तरुण सरपंच असद जावेद अली सैय्यद तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद जळगावचे गटनेते जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय कॉंग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, कॉंग्रेस नेते व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जावेद अली सैय्यद, मल्टी परपज सह. सोसायटीचे चेअरमन जियाउलहक सैय्यद  सलामत अली सैय्यद व सर्व ग्राम पंचायत सदस्य होते.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बि.के. पारधी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित  करण्यात आले. यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे, मतिउर  रहेमान पिरजादे, कबीर उद्दीन फारुकी ख्खाजा मोईनुद्दीन, युवराज इंगळे, संतोष तायडे, संजय तायडे, कारकुन परवेझ सैय्यद व सर्व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Protected Content