ट्रकच्या धडकेत एक ठार ; तीन जखमी

एरंडोल प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या वाहनास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यु तर तीन जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, या दुर्घटनेत कालू खाटीक ठार झाले असून बाकी तीन जखमी (नावे माहित नाही) झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर एरंडोल पातरखेडे दरम्यान शहा डिझेल पंपा नजीक २१ जूलै २०२१ रोजी पहाटे ५.३० वाटेच्या सुमारास घडली आहे. ट्रक क्रं. WB 23 E 4007 हा रस्त्यावर पार्किंग लाईट न लावता धोकादायक परिस्थितीत थांबला होता. MH 19 CY 6030 क्रमांकाच्या वाहनाने उभे असलेल्या वाहनास धडक दिली. 

या प्रकरणी टाटा एन्ट्रा कंपनी चा ( ६०३० )  गाडी चालक सूरज रामदास बैरागी या. अजयनगर वरणगाव याने एरंडोल पो. स्टे. ला  फिर्याद दिल्यावरुन महामार्ग वर उभ्या असलेल्या ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. विकास देशमुख , संदीप सातपूते ,अकील मुजावर, हमीद तडवी हे पुढील तपास करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!