उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या कोरोना मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन

जळगाव, प्रतिनिधी । येथील उज़मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयी जनतेमध्ये जनजागृतीसाठी ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’ या विशेष मोहिमेअंतर्गत मुफ्ती हरून नदवी ह्यांच्या हस्ते नुकतेच कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. फिरोज शेख ह्यांच्या मनियार क्लिनिक,कोल्हे बिल्डिंग,शेरा चौक येथे कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर भाषणत मुफ्ती हारून नदावी यांनी आपले मत व्यक्त केले. केंद्राचे उद्दिष्ट उज़मा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. अल्तमश हसन यांनी सांगितले की, केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण व नातवाइकांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल आणि सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल. ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सलीम इनामदार यांनी ही आपले मत व्यक्त करतांना उज़मा बहुद्देशीय संस्था च्या कोरोना जनजागृी मोहिमेची प्रशंसा केली. डॉ फिरोज शेख यांनी आभार व्यक्त केले.

Protected Content