पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये : जिल्हा कृषी अधिकारी (व्हिडीओ)

sambhaji thakur

जळगाव (प्रतिनिधी) आठ जून नंतर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील मशागतीची कामे करून घ्यावी. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आव्हान जळगाव जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

 

लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. तसेच आतापासूनच शेक्तऱ्यांनी मशागतीची कामे देखील सुरुवात केली आहे. पावसाला सुरुवात झाल्यावर शेतकरी बांधव पेरणीला सुरुवात करतात. मात्र नंतर उशिराने पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवते. याकरिता पुरेसा पाऊस झाल्याशिवाय म्हणजेच 65m.m पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे. तसेच पेरणी करताना आंतरपीक सुद्धा घ्यावे व योग्य ते खतांचा वापर पेरणी करतांना केला तर त्याचा चांगला उपयोग होतो. कृषी विद्यापीठांनी किंवा कृषी तज्ञांनी सांगितलेल्या आवश्यक तेवढ्याच खताचा उपयोग करावा,असे आव्हान देखील जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

 

Add Comment

Protected Content