मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; आता १ सप्टेंबरला प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या युक्तिवादानंतर, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता १ सप्टेंबरला प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण सुनावणीदरम्यान कोणातीही भरती केली जाणार नाही, असं कोर्टात सांगण्यात आलं.

हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करा, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. जर तसा निर्णय झाला तर १ सप्टेंबरला ही सुनावणी होणार नाही, ती नव्या तारखेनुसार ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण आणि मराठा आरक्षणाबाबतची मूळ याचिका हे दोन महत्त्वाचे मुद्दे या सुनावणीत चर्चिला जाईल.

आज न्यायालयाने कोणतीही हस्तक्षेप याचिका स्वीकारलेली नाही. कोर्टाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. राज्य सरकारकडून कोणतीही भरती केलेली नाही. कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यंत भरती केली जाणार नाही असं राज्याने परिपत्रक काढलं आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेवर स्थगिती दिलेली नाही. हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही हे २५ ऑगस्टला ठरणार आहे. जर तसा निर्णय झाला, तर 1 सप्टेंबरला ही सुनावणी होणार नाही, ती पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल”, असे विनोद पाटील यांनी सांगितलं.

मागील सुनावणी
कोर्टात १५ जुलैला झालेल्या सुनावणीनुसार आजपासून सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नियोजित होती. या तीन दिवसात दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी दीड-दीड दिवसांचा अवधी देण्यात आला होता. यापूर्वी १५ जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत, कोर्टाने कोणताही अंतरिम आदेश दिला नव्हता. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला होता. आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content