डंपर सोडविण्यासाठी लाचेची मागणी : मंडळ अधिकार्‍यासह तलाठी अटकेत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महसूल खात्याने पकडलेले डंपर सोडविण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारतांना तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती असे की, तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे ३ डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले ३ डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.एमएच १८ AA ११५३ हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे २ महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे गणेश राजाराम महाजन,(वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर) आणि दिनेश शामराव सोनवणे, (वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर) यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम दीड लाख इतकी ठरली. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.

यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज पंचासमक्ष दीड लाख रूपये स्वीकारतांना वरील दोन्ही जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय संजोग बच्छाव, पीआय एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Protected Content