देशमुखांवर खाजगी रुग्णालयात उपचार: इडीचा आक्षेप

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागण्यात आली. परंतू इडी कडून आक्षेप घेण्यात आला.

माजी गृहमंत्री देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सल्ला दिला होता. परंतु आताच तसे करण्याची आवश्यकता नाही. मंत्री देशमुख खाजगी रुगणालयात जे उपचार आहेत तेच उपचार जे.जे. रुग्णालयात आहेत. असे इडी कडून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  शिवाय खांदा निखळण्याचा इतिहास जुना असून त्यांना जे. जे. रुगणालयात शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला असून ते तेथेच उपचार घेऊ शकतात असे इडीकडून म्हटले आहे.

तर खाजगी तसेच निवडलेल्या डॉक्टर कडून उपचार घेणे हा मंत्र्याचा अधिकार आहे. तसेच त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरकडे शस्त्रक्रिया करावी अशी इच्छा असून शस्त्रक्रिये दरम्यान त्यांच्या हृदयाच्या स्थितीवर लक्ष ठेवावे लागणार असल्याचा युक्तिवाद देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी केला आहे. तसेच देखमुख खाजगी रुग्णालयात खर्च करण्यास तयार असतील तर त्यांना शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असे निकम यांनी मांडले. यावर आज मंगळवारी सुनावणी घेतली जाणार आहे.

 

Protected Content