किरणकुमार बकालेंना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी शिंदे गटाचे आमरण उपोषण

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव एल. सी. बी. चे मा. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच त्यास सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख किशोर बारावकर हे आज दि. १३ आॅक्टोबर रोजी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. सुरू असलेल्या उपोषणास आ. किशोर पाटील यांनी भेट देऊन थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन घटनाक्रम सांगितला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच डी. जी. यांचेशी बोलतो असे सांगितले. दरम्यान अवघ्या काही मिनिटांतच ना. एकनाथ शिंदे यांचा आ. किशोर पाटील यांना फोन आला व ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, माझे डी. जी. सोबत बोलणे झाले असुन संबंधित किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. तसेच उपोषणकर्ते किशोर बारावकर यांचेशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाषण करुन उपोषण सोडावे असे सांगितले. यावेळी उपोषणस्थळी उपस्थितांनी एकच जल्लोष करत “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा दिल्या.

याठिकाणी आ. किशोर पाटील, उपोषणकर्ते शिवसेना (शिंदे गटाचे) किशोर बारावकर, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, प्रविण ब्राम्हणे, रवि केसवानी, संदिपराजे पाटील, महिला तालुका प्रमुख मंदाकिनी पाटील, उप तालुका प्रमुख सुनंदा महाजन, शहर प्रमुख उर्मिला शेळके, उप शहर प्रमुख सुषमा पाटील, नगरसेविका संगिता पगारे, विशाल राजपुत, सागर पाटील, राहुल पाटील, नंदु पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अखेर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने सदरचे आमरण उपोषण आ. किशोर पाटील यांनी उपोषणकर्ते किशोर बारावकर यांना नारळ पाणी देवुन सोडविले.

Protected Content