पाचोरा येथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न

pachora

 

पाचोरा प्रतिनिधी । येथे तालुकास्तरीय आंतर शालेय स्पर्धेत शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडांगणावर घेण्यात आली असून या स्पर्धेत जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमधील 17 वयोगटातील संघाने फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुऱ्हानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संघाचा पराभव करत विजय मिळवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या संघाची जिल्हास्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सचिव जीवन जैन, स्कूलकमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी व सर्व व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य अनिल जाधव,
सी.ई.ओ अतुल चित्ते, क्रीडा शिक्षक सोनाली दारकोंडे, निवृत्ती तांदळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने संघाचे अभिनंदन केले आहे.

Protected Content