रावेर तालुक्यातील रेशनदुकानांवर जिल्हापुरवठा विभागाची पाहणी

रावेर प्रतिनिधी । जिल्हा पुरवठा विभागाने आज रावेर शहरातील रेशनदुकानांवर अचानकरित्या झाडाझडती करण्यात आली. अनेक दुकानांची पहाणी केल्यानंतर तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा पुरवठा विभागाने आज रावेर तालुक्यात अचानकरित्या रेशनदुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यात तालुक्यातील ५ रेशन दुकानांवर तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात अजंदे -१, ऐनपुर-२, शिंगाडी-१, आणि खिर्डी-१ असे एकुण पाच दुकानांवर तफावत असल्याचे दिसून आले आहे.

या सर्व रेशनदुकानांची तपासणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे. शिंगाडी येथील सरपंच यांच्या दुकानांबद्दल प्रचंड तक्रारी होत्या. त्यासाठी गावात जाऊन चौकशी केली असता अनेक तफावती जानवल्या. याप्रकरणी दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यामुळे इतर रेशनदुकादारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content