Home धर्म-समाज आ. शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी फैजपूर नगरपरिषदेला निधी मंजूर

आ. शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी फैजपूर नगरपरिषदेला निधी मंजूर

0
77


फैजपूर , प्रतिनिधी शहरातील नवीन व जुन्या कॉलनी भागातील रस्त्यावर खडीकरण व काँक्रीटीकरणासाठी   राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फैजपूर नगरपरिषद ला २  कोटी ३९  लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल शहरातील कॉलनी भागातील नागरिकांनी आ. शिरीष  चौधरी यांची खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

शहरातील कॉलनी  भागातील विविध कामांना मंजुरी मिळाली. यात  यावल रोडवरील वृंदावन कॉलनीमध्ये खडीकरण व काँक्रिटिकरण करणे.   साने गुरुजी नगर वेल्डिंग वर्कशॉप पासून जानकी नगर पर्यंत काँक्रिटिकरण करणे. साने गुरुजी नगर भाग २  मधील संपूर्ण परिसर,   लक्ष्मी नगर परिसर व  मिरची ग्राऊंड भागात काँक्रिटिकरण करणे. आसाराम नगर मधील ओपन स्पेसमध्ये बाल संस्कार केंद्र बांधणे.  या व्यतिरिक्त ताहा नगर, न्हावी दरवाजा भागातील काही रस्ते ही मंजूर करण्यात आलेले आहेत.  आभारप्रसंगी नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम तडवी, चंद्रकांत चौधरी, राहुल महाजन, मुरलीधर राणे, अशोक किरंगे गुरुजी, गणेश पाटील, राहुल फेंगडे, मनोज पाटील गुरुजी, सुरेश कोलंबे, कुंदन चौधरी सर, प्रशांत गाजरे, कमलाकर गुळवे, योगेश चोपडे, रमेश बोरोले, प्रशांत कपले, वासुदेव कपले सर, डॉ. हरी निळे, दिनेश किरंगे सर  यांसह आदी नागरिक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound