मुक्ताईनगर येथे लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची धडक कारवाई

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने मुक्ताईनगर येथे धडक कारवाई केली आहे.  

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारपासून जिल्ह्यात कड़क लॉकडाऊन राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार व तहसीलदार श्वेता संचेती यांनी आज रोजी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात जिल्हाधिकारी राऊत यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या अनुषंगाने 4 रिक्षा चालक, 3 दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच विना मास्क फिरणारे 15 लोकांकडून 1500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पोलीस स्थानकाच्या हद्दीतील लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या 5 हॉटेल मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून उद्यापासून परवानाधारक दुकानांचे व्यतिरिक्त खुले असणारे दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलीस पथकात पोहेकॉ मोजेश पवार, पोलीस नाईक गणेश मनुरे, गणेश चौधरी, पो. कॉ. नदकिशोर धणके, पो कॉ सुरेश पाटील तसेच नगर पंचायत कर्मचारी सुरेश आलोने, गणेश कोळी आदींचा समावेश होता.

Protected Content