संयुक्त राष्ट्राच्या व्हर्च्युअल परिषदेसाठी रोहित काळे यांची निवड

मुक्ताईनगर प्रतिनिधी ।  आशिया युवा आंतरराष्ट्रीय मॉडेल संयुक्त राष्ट्रांच्या व्हर्च्युअल परिषदेसाठी रोहित पंढरीनाथ काळे यांची भारतामधील प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. 

आशिया युवा आंतरराष्ट्रीय मॉडेल संयुक्त राष्ट्रांच्या आभासी परिषदेसाठी आशियातील सर्व देशातील दोन हजार जागतिक युवा नेत्यांची निवड होणार होती त्यापैकी एक महाराष्ट्र मधील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे रोहित काळे यांची नियुक्ती ७३१७  मधून झाली आणि भारतीय प्रतिनिधी म्हणून करण्यात आली. त्या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये कोरोना आणि घसरत असलेली अर्थव्यवस्था सारख्या अनेक सद्य विषयांवर चर्चा होणार आहे. त्यांची निवड सामाजिक कार्यक्षमतेच्या आधारे केली गेली आहे. त्यांनी  जिल्हास्तरावरील विषयापासून तर राज्य स्तरापर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवली आहेत. मुक्ताईनगर जळगाव येथील रोहित काळे सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी असतात. यासह ते संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक ( United Nation Global Compact) या मध्ये  प्रतिनिधीत्व करणार आहेत. जे १५ जूनला व्हर्च्युअल कॉन्फरन्स होणार आहे. ते आंतरराष्ट्रीय युवा समाज तसेच महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. रोहित काळे यांचं शिक्षण बी. टेक इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार या शाखेमध्ये घेत असून ते भारतीय नागरी सेवा परीक्षेचे अभ्यार्थी असून अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्याबद्दल बोलताना बांगलादेशचे प्रतिनिधी बोलतात की, रोहित यांचं समाजाप्रती असलेली तळमळ व आपल्या कामप्रती  असलेली तळमळ ही खूप काही सांगून जाते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या कामात अजून बळ येईल आणि त्यांच्या रूपाने विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील यासाठी ते कायम प्रयत्नशील असतील याबद्दल तिळमात्र ही शंका नाही.

Protected Content