चैतन्य तांडा येथे अशोक राठोड यांनी केले परळ वाटप!

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात प्राणवायूच्या अभावामुळे अनेक रूग्ण हे दगावत असताना दुसरीकडे पाण्याच्या अभावामुळे असंख्य पशुपक्षी हे  मृत्यूमुखी पडत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पक्षीप्रेमी अशोक राठोड यांनी तालुक्यात पक्षांसाठी अनोखा उपक्रमास प्रारंभ केला आहे.

चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके तीव्र स्वरूपात जाणवू लागले आहेत. त्यात पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे अनेक पशुपक्षी हे मृत्यूमुखी पडत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहे.  या भयंकर काळात सामाजिक भान जोपासत ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी तालुक्यात गावोगावी जाऊन पक्षांसाठी परळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे  तालुक्यातून त्यांचा भरभरून कौतुक होत आहे. तालुक्यातील चैतन्य तांडा येथे पाण्याच्या अभावामुळे पक्षांची गैरसोय होत असल्याचे कळताच अशोक राठोड यांनी धाव घेऊन परळचे वाटप केले. यावेळी द्रोण, परळ ह्या झाडांवर बांधून त्यात पाणी टाकण्यात आले. दुधी भोपळ्यांपासुन द्रोण, परळ बनवण्यात आली  आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी अशोक राठोड यांची प्रशंसा केली. यावेळी ग्रामसेवक कैलास जाधव, उपसरपंच आनंदा राठोड, करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी उदल पवार, कोंडु राठोड, भावलाल चव्हाण, साईनाथ राठोड, वसंत राठोड, जितेंद्र ठाकरे आदींचा सहकार्य लाभले.

Protected Content