आ. सावकारे यांच्या प्रयत्नांनी कंडारी गावाला दलित वस्ती सुधार अंतर्गत निधी

00111e80 b664 45e3 8af6 4595e88f65c9

 

भुसावळ (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या १२५व्या सुवर्ण जयंती निमित्त दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने कंडारी गावासाठी प्रथम अनुदान ४ कोटी २७ लाख ३५ हजार रुपये मंजुर झाले आहे. त्या अनुषंगाने कंडारीचे सरपंच योगीता शिंगारे व ग्रामपंचायत सदस्य व कंडारी गावातील नागरीकांतर्फे मान्यवरांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमात महामंडलेश्र्वर जनार्दन हरीजी महाराज, आमदार संजय सावकारे व सुधीर जंजाळे नवनिर्वाचीत एससी,एसटी रेल्वे युनियचे मंडळ अध्यक्ष, संत व मांन्यवराचा सत्कार करण्यात आला. महामंडलेश्र्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या कंडारी गावातील आगमनाने गावातील वातावरण प्रसन्न झाले होते. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती डाॅ. सौंगदाणे, फेकरीचे सरपंच मोर, शामा मोरे व सुरेश रामा यशोदे व कंडारी ग्राम पंचायत सदस्य विनायक वासनिक,राम जाधव,श्री. जोहरे, मनिषा महाजन,सुषमा सोनवणे,माधुरी पाटील यांची होती. सुत्रसंचालन विजय बार्‍हे यांनी तर आभार निलेश महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी संदिप शिंगारे, यशवंत चौधरी व माजी सरपंच डाॅ. सुरेभान पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content